जगतगुरु तुकाराम महाराज यांचे निवडक अभंग या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे . संत तुकाराम महाराजांचे अभंग हे मराठी साहित्य आणि भक्ती परंपरेतील अमूल्य ठेवा आहेत. त्यांच्या रचनांमध्ये भक्तीभाव, आत्मचिंतन, समाजविकास आणि अध्यात्मिक उन्नती यांचा सुंदर संगम आढळतो. त्यांच्या अभंगांमधून काही विशेष वैशिष्ट्ये समोर येतात: सत्य आणि सच्च्या भक्तीचा आग्रह: त्यांनी ढोंगीपणा, पाखंड, आणि कर्मकांडांना विरोध केला आणि मन:शुद्धी व ईश्वरनिष्ठा यावर भर दिला.
शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६
पश्चात्तापाच्या उंबरठ्यावर उभं आयुष्य…
काही वर्षांपूर्वी मी एक कथा-कादंबरी वाचली होती. नाव आज आठवत नाही, पण तिचा मतितार्थ आजही मनात ठसठसतो आहे. ती कथा एका नर्सने सांगितलेली होती—ज्या दवाखान्यातील एका वॉर्डमध्ये शेवटच्या अवस्थेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत होती. काही दिवसांचे पाहुणे, काही तासांचे, तर काही क्षणांचे… अशा लोकांच्या अगदी जवळून तिने मृत्यू पाहिला होता.
ती कथा सत्य घटनेवर आधारित होती.
त्या नर्सने एक फार बोलकं सत्य मांडलं होतं—
माणूस शेवटी पश्चात्ताप करतो.
“मी असं करायला नको होतं…”
“मी याच्याशी चुकीचं वागलो…”
“मी खोटे आरोप केले…”
“माझ्या अहंकारापायी नातं तुटलं…”
मरण समोर उभं असताना, संपत्ती आठवत नाही, पद आठवत नाही, सत्ता आठवत नाही… आठवतो तो फक्त आपला अन्याय, आपली चूक, आणि न बोललेली माफी.
आणि हे वाचताना एक प्रश्न मनाला बोचतो—
आपण आज कुठल्या दिशेने चाललो आहोत?
चूक दिसते, पण आपण तिला चूक म्हणत नाही.
एखादी चुकीची गोष्ट घडते, पण “मला काय त्याचं” म्हणून दुर्लक्ष करतो.
पैशासाठी मतदान करतो.
“हा आपल्या पक्षाचा आहे” किंवा “हा आपल्या गटाचा आहे” म्हणून त्याच्या चुकीवर पांघरूण घालतो.
अशा कितीतरी गोष्टी आपण रोज सहजपणे करत राहतो…
पण थांबून कधी विचार करत नाही.
एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे—
आपण या जगाचे मालक नाही. तर काही दिवस काही वर्षे यासाठी येथे आलेले
आपण इथे पाहुणे आहोत.
आज नाही तर उद्या,
कधी ना कधी…
आपल्यालाही जायचंच आहे.
मग जाताना,
डोळे मिटताना,
मनात पश्चात्तापाची जळजळ उरू नये—
असं आयुष्य जगणं,
असं वागणं,
असं अनुकरण ठेवणं…
हेच खरं यश आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
नका दंतकथा येथे सांगो कोणी…” : तुकाराम महाराजांचा चिकित्सक विचार
नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ।।१।। अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हांपुढे ।।२।। निवडी वेगळें क्षीर...
-
🛕 श्री हालसिद्ध नाथांची पावन भूमी – आप्पाचीवाडी "संकटाच्या काळात श्री हालसिद्ध नाथ महाराजांचे स्मरण केले की, भीती नाहीशी होते"...
-
लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाटीं देशोदेशीं ॥१॥ नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥२॥ तुका ...
-
🪔 विद्रोही राष्ट्रसंत तुकाराम महाराज 🙏 "तुका म्हणे, जेथें जाई तिथे मम विठोबा रक्षी" – या शब्दांत संत तुकाराम महाराजांनी दे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा